अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी व मुंबईतील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. मुंबईत ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नौदलाने पंतप्रधान मोदींसाठी भोजन समारंभ आयोजित केले आहे. परंतु भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांना मात्र या भोजन समारंभाचे निमंत्रण नाही. या भोजन समारंभास राज्यपाल विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना मात्र या भोजनाचे निमंत्रण नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमात सहभागी होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. नौदलाने पंतप्रधान मोदींसाठी राजभवनात भोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना याचे निमंत्रण नाही. परंतु गिरगाव चौपाटी येथे ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे  यांनी शुक्रवारी अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात नाव न घेता भाजपला टोला लगावला होता. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रोड रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. रामाचे नाव दिलेल्या रेल्वे स्थानकाचे श्रेय लाटण्याचा प्रकार कार्यक्रमस्थळी झाला. रामाचे नाव घेऊन लोकांना बनवून आजपर्यंत खूप राजकारण केले. राम नामाचा जप करतच मोठे झालात. आता अयोध्येमध्ये राम मंदिर उभारुन दाखवावे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy not invited uddhav thackeray for lunch with pm narendra modi
First published on: 24-12-2016 at 11:50 IST