“देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप नवाब मलिकांनी कबूल केले”

आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा देत नवाब मलिकांवर निशाणा साधला

Nawab-Malik
संग्रहित छायाचित्र

नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सुरु असलेल्या शाब्दीक युद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप मलिकांवर करण्यात आला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान भाजपानेते आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा देत नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोपांपैकी नवाब मलिक यांनी सर्व आरोप कबूल केले आहेत. हसीना पारकर विषयात बोलायची हिंमत नसल्यामुळे त्याला मौन कबुली दिली आहे. मलिक म्हणतात, आम्ही भाडेकरु होतो आणि संपुर्ण जागेची मालकी आम्ही घेतली. तीही ३० लाख कबूल करुन २० लाखात, मुंबईच्या भाडेकरुंना तुम्ही मुर्ख समजता का, असे नवाबी भाडेकरु मुंबईत शोधून सापडणार नाहीत,” असे आशिष शेलार म्हणाले. 

सरदार शाहवली खान हा वॉचमन होता आणि त्याने सातबाऱ्यावर नाव टाकलं म्हणून आम्हाला त्याला पैसे द्यावे लागले, असे मलिक म्हणाले. यावर आशिष शेलार म्हणाले, “मुंबईतील वॉचमनला हे नवाबी धंदा शिकवत आहेत का?, की वॉचमन आता कोणाच्याही जागेच्या सातबाऱ्यावर नाव चढवू शकतात. कुठलाही व्यवहार न करता?”

या चांडाळ चौकडीत, नवाबी भाडेकरू, नवाबी दर, नवाबी धंदा, मालक हे अंडरवर्ल्डचे व्यवहार करण्यासाठी काम करत आहेत. स्वत: नवाब मलिकांनी सरदार शाहवली खानशी व्यवहार झाल्याचे सांगितले आहे. त्याला पैसे दिली. तो बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी होता. बॉम्ब ब्लास्ट १९९३ ला झाला. व्यवहार २००५ ला झाला. या अर्थ मंत्रीपदावार राहीलेल्या माणसाने बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपीशी व्यवहार केले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर एफआयआर दाखल कारावा, अशी मागणी शेलार यांनी केली. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik admitted the allegations made by devendra fadnavis ashish shelar pc srk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या