“चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग…”, नवाब मलिकांकडून प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे,” असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ ट्वीट करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक म्हणाले, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका.”

धनंजय मुंडेंकडूनही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

धनंजय मुंडे म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे.”

नवाब मलिक काय म्हणाले होते?

भाजपाचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात. ते एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपाचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार आहेत.”

हेही वाचा : कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ नवाब मलिकांनी केला शेअर; म्हणाले…

के. पी. गोसावी, भाजपाचा एक नेता, त्याच पत्नी एका खासगी कंपनीत संचालक आहेत. विधानभवनाच्या पटलावर मी हे सर्व ठेवणार आहे, असंही मलिक म्हणाले होते. नवाब मलिक यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पोपट रोज बोलत असल्याची टीका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik answer chandrakant patil over he is in my pocket remark pbs

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या