तुमच्यावरील अब्रुनुकसानीचे आरोप मान्य आहेत का? कोर्टाच्या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले…

न्यायालयाने नवाब मलिक यांना त्यांच्यावरील अब्रुनुकसानीचे आरोप मान्य आहेत का? असा प्रश्न विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात माझगाव न्यायालयात हजेरी लावली. यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना त्यांच्यावरील अब्रुनुकसानीचे आरोप मान्य आहेत का? असा प्रश्न विचारला. यावर मलिकांनी हे आरोप अमान्य करत आपली बाजू मांडली.

नवाब मलिक म्हणाले, “न्यायालयात आमच्या आणि त्यांच्या वकिलांकडून काही गोष्टी मांडण्यात आल्या. कोर्टाने विचारलं तुमच्यावरील अब्रुनुकसानीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? मी हे आरोप अजिबात मान्य नसल्याचं सांगितलं. मी हे आरोप मान्य करायला अजिबात तयार नाही. मी जे काही सांगितलंय त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते सर्व पुरावे आम्ही कोर्टासमोर ठेऊ. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे.”

“आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरणही न्यायालयासमोर ठेवलं आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

हेही वाचा : नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…!

“मला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. मी तसा बाँड दिला आहे. यापुढे जेव्हा न्यायालयात तारीख असेल तेव्हा आम्ही न्यायालयात हजर होऊ,” असंही मलिकांनी नमूद केलं.

गर्दी जमवून न्यायालयावर दबाव आणल्याच्या आरोपावर मलिकांचं प्रत्युत्तर

नवाब मलिकांवर गर्दी जमवून न्यायालयावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आम्ही गर्दी जमा केलेली नाही. माझ्यासोबत माझे सरकारी सुरक्षारक्षक आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik answer court over defamation case by bjp mohit kumboj pbs

Next Story
शाळांबाबत शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी