मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली़

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक

मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून (पान २ वर) (पान १ वरून) ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ‘ईडी’ कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.

मलिक हे ‘ईडी’च्या चौकशीला सहकार्य करत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास कैसर -ए- हिंदू येथील ‘ईडी’च्या कार्यालयातून मलिक यांना जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘झुकेंगे नही, डरेंगे नही आणि एक्स्पोज करेंगे’, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

‘ईडी’ने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता (एएसजी) अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून ३ फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे (मनी लॉन्डिरग) असल्याचा दावा ‘ईडी’ने १४ दिवसांची कोठडी मागताना केला.

मलिक यांच्याकडून खंडन

मलिक यांनी जमीन खरेदी व्यवहार केलेला सलीम पटेल हा हसिना पारकरचा चालक नसून, वेगळी व्यक्ती आहे, असा दावा मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी केला. मलिक यांना जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी समन्स न देता बळजबरीने ‘ईडी’ कार्यालयात नेण्यात आले आणि तेथे स्वाक्षरी घेण्यात आली. कोणत्या कारणास्तव कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्यात आली नाही. कारवाई करण्यापूर्वी किंवा कोणतीही प्रतिबंधक कारवाई करण्यापूर्वी ‘ईडी’ने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोपही मलिक यांच्याकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.

कार्यकर्त्यांची गर्दी

मलिक यांना ‘ईडी’ कार्यालयात आणल्यानंतर सकाळपासूनच बॅलार्ड पिअर परिसरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गर्दी करण्यास सुरूवात केली होती. पोलिसांनाही याबाबत माहिती मिळाल्यामुळे परिसरात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ‘ईडी’ कार्यालयाजवळ जाणाऱ्या सर्व मार्गिका बंद करण्यात आल्या होत्या. ‘ईडी’ कार्यालयाजवळील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक उपायुक्त हरी बालाजी स्वत: बंदोबस्तात सहभागी होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनीही यावेळी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

समन्स नसतानाही कारवाईचा दावा

नवाब मलिक यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ‘ईडी’ने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना याप्रकरणी तपासात सहभागी होण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. पण, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मलिकांवर आरोप काय?

दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आह़े 

मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकटय़ा वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे (शेड) या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र, या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली, त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ‘ईडी’ला जबाबात सांगितले.

या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ‘ईडी’ने खानचा जबाबही नोंदवला आहे. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील ‘पॉवर ऑप अ‍ॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली, असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या, त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे.