माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना भाजपा नेते मोहित भारतीय यांच्या बदनामीच्या तक्रारीत जामीन मंजूर केला. मलिक यांना न्यायालयात हजर राहून जामीन मागण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय यांनी त्यांच्या तक्रारीत असा आरोप केलाय, की मलिक यांनी त्यांच्या कथित दाव्यांना खरे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याशिवाय युक्तिवाद करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये मलिक कोर्टात हजर झाले होते.

मलिक यांच्यावर असा आरोप होता की, नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांनी कोर्टात जामीन मागितला होता, त्यावेळी  कोर्टातून बाहेर पडताच त्यांनी भारतीय यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, माझगाव, मुंबई येथील महानगर दंडाधिकारी, पीआय मोकाशी यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी मलिक यांना नोटीस बजावली होती. मलिक यांच्याकडून सार्वजनिक स्तरावर भारतीयांविरुद्ध बदनामीकारक विधाने केली गेली आहेत, असं त्यात म्हटलं होतं. मोहित भारतीय यांच्यातर्फे वकील फैज मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले की, मलिकांना जामीन मिळाल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये त्यांनी मोहित भारतीय यांची बदनामी केली होती.

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

बुधवारी मलिक न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीश मोकाशी यांनी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मोहित भारतीय यांची मलिकांविरोधात बदनामीची ही दुसरी तक्रार आहे, याची दखल घेऊन भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे निर्देशही कोर्टाने मलिक यांना दिले.

“नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) भाजपाच्या प्रभावाखाली काम करत आहे” असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर भारतीय यांनी यापूर्वी मलिक यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी न्यायालयाने मलिक यांना नोटीस बजावली होती आणि त्यानंतर मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.