भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. “समीर वानखेडे यांना “समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है” असं म्हणतात त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? हे विचारावं,” असं म्हणत गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांना मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“पुरुषोत्तम सोलंकी यांचे छोट्या शकील आणि दाऊदशी संबंध होते. सोलंकीवर १९९२मध्ये आमचं सरकार असताना कारवाई करण्यात आली होती. हेच सोलंकी नंतर गुजरातच्या भावनगरला राहायला गेले आणि अपक्ष निवडून आले. त्यांना मोदी सरकारच्या काळात १० वर्ष मंत्रीपद देण्यात आलं. किरीट सोमय्या तुम्ही मोदींना विचारा की हा दाऊदशी संलग्न माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा होता. याचं उत्तर तुम्हाला मिळेल,” असं मलिक म्हणाले.

नवाब मलिकांचा आरोप काय?

किरीट सोमय्या म्हणाले, “समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय.”