नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केलाय. मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत, असा आरोप मलिकांनी केला. तसेच या संशयितांचे फोटोही ट्वीट केलेत. यावेळी नवाब मलिकांनी या फोटोतील लोकांना कुणी ओळखत असेल तर माहिती देण्याचंही आवाहन केलंय.

नवाब मलिक म्हणाले, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”

हेही वाचा : “झेड प्लस सुरक्षाही कंगनाला वाचवू शकणार नाही”, नवाब मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून साधला निशाणा!

नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या फोटोत काय दिसतंय?

नवाब मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले आहेत. यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत आहे. तसेच त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे.

नवाब मलिक यांनी या ५ फोटोंमध्ये एक फोटो गाडीचाही ट्वीट केलाय. त्यात गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. मात्र, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik serious allegation of recce of house tweet some photos pbs

Next Story
फडणवीस-पवारांचा अमित शाहांसोबत फोटो व्हायरल होताच राष्ट्रवादीचं खोचक ट्वीट; म्हणे, “सरकार पाडण्याच्या गजाल्या…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी