scorecardresearch

“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप; दरेकरांनी दिलं उत्तर

भावना गवळी, अनिल देशमुख आणि अन्य नेत्यांना राजकीय हेतूने कटकारस्थान रचून बदनाम केल्या जात आहे

Nawab Malik serious allegations against Devendra Fadnavis
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्रसरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपाचे सरकार नसल्याने ईडी व सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपाचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

हेही वाचा – सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात…

दरम्यान, नवाब मलिकांच्या आरोपाला विरोधीनेचे प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. “तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकरचा विश्वास नाही. आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का?, राज्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने राज्याच्या विकासाठी सरकार कोणाचेही असो त्याला समर्थन दिले आहे. व सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण तुमचे उद्देशचं या ठीकाणी जनहिताचे नसतील आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय असतील तर अधिकारी अशावेळी मदत करत नसतात. तसेच जर चुकीचे होत असेल तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती जात असेल. मात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याचे काही कारण नाही.” असे देरेकर म्हणाले.

“भाजपाच्या कुठल्याही नेत्याने सरकार पाडण्याच्या बाबतीच कुठलही वक्तव्य केलेलं नाही. या तिन पक्षांमध्ये ऐवढा चांगला समन्वय आहे. की तेच ऐकमेकांना कधी पाडतील हे आपल्याला कळणार नाही.  सरकारमध्ये विसंवाद आहे, असंतोष आहे. त्यामुळे त्यानांच आपलं सरकार पडेल,” अशी भीती असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik serious allegations against devendra fadnavis pravin darekar answer srk