रिया चक्रवर्तीला NCB दिलं समन्स; मुंबई पोलिसांसह टीम पोहचली घरी

रिया सकाळी साडेदहा वाजता एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, एनसीबी टीम मुंबई पोलिसांसह या प्रकरणातील कथीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी पोहचली. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला समन्स बजावलं.

समन्स बजावताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला दोन पर्याय दिले. यामध्ये रियाला चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन करताना तिने स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी यावं किंवा तीनं आत्ता आमच्या टीमसोबत चौकशीसाठी चलावं. एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडे म्हणाले, रियाला समन्स देण्यात आलं आहे. यावेळी ती स्वतः घरी हजर होती.

एनसीबीची टीम आजच रिया चक्रवर्तीची याप्रकरणी चौकशी करणार असून रिया चौकशीसाठी सकाळी साडेदहा वाजता स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणी एनसीबी शुक्रवारी देखील सकाळी तपासासाठी रियाच्या घरी पोहोचली होती. यावेळी टीमने रियाची चौकशीही केली. त्यानंतर एनसीबीची टीम रियाचा भाऊ शोविकला आपल्यासोबत घेऊन गेली होती. याप्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncb and mumbai police team has come to serve the summon aau