Aryan Khan Drugs Case : मोठी बातमी, ड्रग्ज प्रकरणी NCB ची आर्यन खानला क्लीन चिट

Drugs-On-Cruise Case : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.

Aryan Khan Clean Chit : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे.

पुरावे न मिळाल्याने आरोपपत्रातून वगळण्यात आलेले ६ जण कोण?

१. आर्यन खान
२. अविन शुक्ला
३. गोपाल आनंद
४. समीर साईघन
५. भास्कर अरोरा
६. मानव सिंघल

आर्यन खान प्रकरणातील नेमक्या घडामोडी काय?

एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना पुरावे न मिळाल्याने क्लिन चीट देताना या प्रकरणातील घटनाक्रमाची माहितीही दिली आहे. याप्रमाणे, एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतलं. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कोर्डिला क्रुझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीने केला. नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आलं. एसआयटीने १४ आरोपींविरोधात तपास केला. तपासात ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे आरोपपत्रातून नाव हटवण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

या प्रकरणी ‘एनसीबी’ने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख; म्हणाले, “भाजपाचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही…”

एनसीबीने आर्यनसोबत इतर सात जणांनाही ताब्यात घेतले होते. एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncb give clean chit to aryan khan son of shahrukh khan in cruise ship drugs case mumbai pbs

Next Story
संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी