एकीकडे तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर तुम्ही तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? अशी विचारणा केली असून पक्षाचा स्थापना दिवसही तुम्ही तारखेनुसार साजरा करता असं म्हटलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचा मुद्दा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर उत्तर दिलं.

मुनगंटीवार काय म्हणाले –

“आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेना, भाजपाच्या काही आमदारांनीदेखील महाराजांना वंदन केलं. जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो लिफ्टसमोर ठेवतो आणि सदस्य पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे. पण राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?,” अशी विचारणा सुधीर मुंनगंटीवार यांनी केली.

udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

शिवजयंतीचा वाद विधीमंडळात; मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताच अजित पवारांचं उत्तर, म्हणाले “हे सरकार…”

“राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करत असताना राज्याचे अधिकारी आम्ही १९ फेब्रुवारीला साजरी करतो म्हणतात. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे तिथी मान्य नाही म्हणणं म्हणजे ही द्विधा मनस्थिती आहे. ही परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या एका नेत्यानेही तिथीनुसार साजरी करा असं सांगितलं आहे. पण जर मुख्यमंत्री साजरी करत असतील तर तसे आदेश द्यावेत,” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवारांनी दिलं उत्तर –

“हे सरकार येण्याआधी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी काम केलं. मीदेखील पाच वर्ष येत होतो पण तेव्हा कधीही तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको…ते आपले दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे. पण मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते. त्यांनी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला हे रेकॉर्डवर आणलं. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात. ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करायचो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी कराची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करु शकतात. कारण नसताना वेगळी चर्चा नको. सरकारी अधिकाऱ्यांना १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. आज सुट्टी नसून काम सुरु आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मागे एखादी गोष्ट केली नाही, म्हणून भविष्यात करता येत नाही का? असा सवाल विचारला. आम्ही तुम्हाला सूचना करत असताना असं उत्तर अपेक्षित नाही. जेव्हा एखादी गोष्ट लक्षात येते तेव्हा त्यात सुधारणा केली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे म्हणत असताना अडचण काय आहे? असंही त्यांनी विचारलं.

“आपल्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन ज्यांना करायचं आहे त्यांनी अभिवादन करा. छोट्या फोटोपेक्षा मोठ्या पुतळ्यासमोर जाऊन करा ना. उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का? सिंहासनावर बसलेले महाराज आहेत,” असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.