राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर सध्या विधिंमडळात चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात आज चर्चा चालू असताना सत्ताधारी बाकांवर मंत्री अनुपस्थित असल्यामुळे त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपानंही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांनी त्यावरून भाजपाला सुनावलं.

नेमंक काय घडलं?

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच अनुपस्थित असल्याची बाब धनंजय मुंडेंनी निदर्शनास आणून दिली. यावेळी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जेव्हा विरोधी पक्षनेते २९३ चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल, तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचं? सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचं सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही”, असं धनंजय मुंडे यावेळी सभागृहात म्हणाले.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

समोरचं पहिलं बाकडं तर रिकामंच असतं – अजित पवार

यापाठोपाठ विरोधी बाकांवरून “हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे”, अशा घोषणा केल्या जाऊ लागल्या. त्यावर अजित पवारांनीही सरकारवर तोंडसुख घेतलं. “मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतोय की यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. पण अक्षरश: भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं तर मोकळंच असतं. त्यावर कुणीही नसतं. आम्हीही सरकार चालवलंय”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

Video: “आमची निरमा पावडर गुजरातहून येते”, भाजपा आमदाराचं विधानपरिषदेत वक्तव्य; म्हणे, “आमच्याकडे येणाऱ्याला…!”

अजित पवारांच्या मुद्द्यावर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. “विरोधी पक्षनेते जेव्हा बोलतात, तेव्हा सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला हवेत. एवढाही प्रोटोकॉल लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल, तर आम्ही इथे शांत बसतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इथे येईपर्यंत आम्ही काही बोलत नाही. कसं वागायचं ते आता तुम्ही ठरवा. त्यांनी किमान खेद तरी व्यक्त करा की गैरहजर होते म्हणून”, असं जयंत पाटील म्हणाले.

“कृषिमंत्री अकलेचे तारे तोडतायत”, अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर म्हणाले…

“अतुलजी, तुम्ही नीट आठवा…”

यावर भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी “तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?” असा सवाल करताच त्यावरून अजित पवारांनी त्यांना सुनावलं. “अतुलजी, तुम्ही नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची, तेव्हा असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी ९ वाजल्यापासून असायचा. मी तुम्हाला प्रत्येकाला आदर द्यायचो, प्रत्येकाला सकारात्मक उत्तर द्यायचो”, अशा शब्दांत अजित पवारांनी भाजपाला सुनावलं.