ncp leader anil deshmukh may not be convicted in money laundering case bombay hc in bail order zws 70 | Loksatta

पुराव्यांचा विचार करता देशमुख दोषी ठरू शकत नाहीत ; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण

कायदेशीर मार्गाने मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता कर उल्लंघनासाठी कारवाईपात्र असू शकते.

पुराव्यांचा विचार करता देशमुख दोषी ठरू शकत नाहीत ; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण
अनिल देशमुख

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातील पुराव्यांचा विचार करता अंतिमत: त्यांना याप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. 

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या प्रकरणात देशमुख यांना न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या आदेशाची प्रत मंगळवारी रात्री उशिरा उपलब्ध झाली.

कायदेशीर मार्गाने मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता कर उल्लंघनासाठी कारवाईपात्र असू शकते. परंतु ही मालमत्ता गुन्ह्याच्या रकमेशी संबंधित नसेल तर त्याला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने गुन्हेगारी कृतीतून मिळवलेली मालमत्ताच आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा ठरू शकते. मात्र देशमुख यांच्यावरील आरोपांच्या समर्थनार्थ ईडीने ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यावरून देशमुख यांनी नेमके कोणते गुन्हेगारी कृत्य केले आणि त्यातून त्यांना पैसे कसे मिळाले हे स्पष्टपणे सांगण्यात आले नाही असे न्यायालयाने देशमुख यांना जामीन देताना नमूद केले आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सेवा कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. वाझे हे देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाले आहेत. या प्रकरणातही त्यांनी माफीचा साक्षीदार होण्यास ईडीने आक्षेप घेतलेला नाही. परंतु या प्रकरणात वाझे हे सहआरोपी आहेत. त्यामुळे खटल्याच्या या टप्प्यावर त्यांचा जबाब प्रकरणातील अन्य आरोपींविरोधात किती प्रमाणात वापरायचा याचा विचार करावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सीबीआय प्रकरणातही देशमुख जामिनासाठी अर्ज करणार

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत देशमुख यांना कारागृहातच राहावे लागणार आहे. त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर होताच देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयातही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे त्यांच्या वकिलांतर्फे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच! ; उपमुख्यमंत्री संतापले

संबंधित बातम्या

नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
मुंबई: स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून साडेचार कोटीची फसवणूक; कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईः परदेशातून भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली अंधेरीतील तरुणीची चार लाखांची फसवणूक
उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
फॉक्सकॉनकडून किती लाच मागितली होती?; आशीष शेलार यांचा महाविकास आघाडीला सवाल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की…”, फडणवीसांचा आपवर हल्लाबोल
विश्लेषण: गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचे रहस्य काय? ‘गुजरात मॉडेल’ आता लोकसभा निवडणुकीतही?
पुणे : नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई
PAK vs ENG Test Series: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम हॉटेलजवळ गोळीबार, पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ आठवणी
नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं