खडसेंना आठवडाभर अटकेपासून संरक्षण

नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयासमोर अर्ज करण्याची सूचनाही केली.

eknath khadse
एकनाथ खडसे (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : भोसरी येथील जमीन संपादन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अटक होण्यापासून उच्च न्यायालयाने एक आठवड्याचा अंतरिम दिलासा गुरूवारी दिला. त्याचवेळी त्यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयासमोर अर्ज करण्याची सूचनाही केली.

या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेऊन खडसे दाम्पत्याला समन्स बजावून न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र खडसे यांना मूळव्याधीचा त्रास होत असल्याने सध्या ते बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे दोनवेळा समन्स बजावूनही ते न्यायालयासमोर हजर झाले नव्हते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader eknath khadse accused in bhosari land acquisition scam akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या