मुंबई : भोसरी येथील जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्र वारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात हजार पानांचे आरोपपत्र दाखल के ले.

खडसे आणि चौधरी यांनी पुणे येथील ३१.०१ कोटी रुपयांची जागा ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. ही जमीन चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आली. तसेच जमीन खरेदीचे पैसे पाच कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आले. या कंपन्यांकडून कर्ज म्हणून हे पैसे घेतल्याचा दावा चौधरी यांनी के ला असला तरी या कं पन्या बंद असल्याचे तपासात उघड झाल्याचा आणि खडसे यांनी महसूल मंत्री असताना त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ही जागा कमी किंमतीत चौधरी यांना मिळवून दिल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे.

याप्रकरणी ‘ईडी‘ने खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पहिल्या समन्सनंतर खडसे चौकशीसाठी ‘ईडी’समोर हजर झाले होते. दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आल्यावर मात्र खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत भविष्यात समन्स बजावण्यापासून आणि अटकेसारख्या कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी के ली होती. हे प्रकरण प्रलंबित असून ‘ईडी’नेही खडसेंवर याचिके वरील सुनावणीपर्यंत कारवाई करणार नाही, अशी हमी दिली आहे.

शुक्रवारी ‘ईडी’ने याप्रकरणी आरोपपत्र दाखल के ले. त्यात चौधरी यांच्यासह खडसे, त्यांची पत्नीलाही आरोपी दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जावयाचा जामीन  फेटाळला

याप्रकरणी आपल्याला विनाकारण गोवण्यात आले आहे. तसेच आपण कोणताही निधी वळवलेला नाही. त्यामुळे आपल्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) कारवाई के ली जाऊ शकत नाही, असा दावा करत चौधरी यांनी जामिनाची मागणी केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौधरी यांच्या जामिनाला विरोध केला. चौधरी यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून निर्णय देण्याआधीच ‘ईडी’ने या प्रकरणी चौधरी आणि अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.