एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या गणेश नाईकांना कोर्टाने दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात दाखल झालेल्या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. रेतीबंदर येथे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेला नाईक यांच्या भाच्याचा ‘ग्लास हाऊस’ आणि बावकळेश्वर मंदिर ट्रस्ट परिसरातील ‘एमआयडीसी’च्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात याचिका दाखल झाली होती. बेलापूर येथील सुमारे १.४५ लाख चौरस मीटर (सुमारे ३६ एकर) जमीन नाईक, त्यांचा मुलगा संदीप आणि भाचा संतोष तांडेल यांनी बळकावल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. हायकोर्टाच्या आदेशानंतर ग्लास हाऊस पाडण्यात आले होते. तर बावकळेश्वर मंदिर ट्रस्ट परिसरातील अतिक्रमणावर एमआयडीसीने नोटीस बजावली होती. या सिडकोने आणि एमआयडीसीने त्यांच्या ताब्यातील जमीन परत घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader ganesh naik land issue glass house midc supreme court
First published on: 09-05-2017 at 23:42 IST