राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार किसन कथोर अडचणीत आले आहेत. २००४ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना उल्हासनगर निवडणूक आयोगाला त्यांनी खोटी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात आली आहे. कथोरे निवडून आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात याचिका दाखल केली होती. २००७ साली याचा निकाल कथोरेंच्या विरोधात गेला. या निकालाला आव्हान देणारी याचिका कथोरेंनी दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला पुढच्या कारवाईचे आदेश दिले आहे.