आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबी’वरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर केला आहे.
आर्यन खान प्रकरणाला गंभीर वळण : समीर वानखेडेंनी लाच मागितल्याचा पंचाचा आरोप




नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पहचान कौन? असं उपहासात्मक ट्वीटदेखील केलं आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो क्रॉप केल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान हा फोटो समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील आहे. कमेंटमध्ये अनेकांनी हा त्यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचं सांगत पूर्ण फोटो शेअर केला आहे. नवाब मलिक यांच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान नबाव मलिक यांनी आणखी एक ट्वीट केलं असून यामध्ये समीर वानखेडेंशी संबंधित कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. समीर वानखेडे यांचा सगळा घोटाळा इथूनच सुरु होत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा आहे. यामध्ये त्यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. “समीर दाऊद वानखेडे….यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती –
समीर वानखेडे सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. क्रांती आणि समीर वानखेडे यांचं २०१७ मध्ये लग्न झालं. त्यांना जुळी मुलंही आहेत.
Aryan Khan Case: मृत आई व तिचा धर्म नवाब मलिक मध्ये का आणतायत? समीर वानखेडेंचा प्रश्न
नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या फोटोमुळे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. क्रांती रेडकरसोबत लग्न करण्याआधी समीर वानखेडे यांचं डॉ शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.