क्रूझवरील अमलीपदार्थ प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यापासून एनसीबी चर्चेत आहे. एकीकडे एनसीबीने केलेल्या कारवाईवरुन खळबळ माजली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोपांनी खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. या कारवाईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही त्यांनी उघड केलं आहे. या सर्व घडामोडीत त्यांनी एक ट्वीट केलं असून पुन्हा एकदा एनसीबीला उघडं पाडण्याचा इशारा दिला आहे.

जावई समीर खानच्या अटकेवरून नवाब मलिक यांचे एनसीबीवर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे!

आर्यन खानच्या अटकेच्या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित कसे?

नवाब मलिक यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “आपण पुन्हा एकदा एनसीबीकडून केलेल्या चुकीच्या गोष्टी उघड करणार आहे. मात्र यावेळी पत्रकार परिषद नाही तर ट्विटवरुन उघडं पाडणार”. त्यामुळे नवाब मलिक आता काय नवीन खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय –

नवाब मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीनं अडकवल्याचा आरोप केला आहे. “माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, समीर वानखेडेंचा फोन नंबर देखील त्यांनी यावेळी दाखवला.

“एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळू नये?”

“कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये आलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवलं. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवलं. रिया चक्रवर्ती प्रकरणातल्या एका आरोपीला या प्रकरणात टाकलं”, असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला.

आर्यन खानच्या अटकेच्या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित कसे?

आर्यन खान व अरबाज मर्चंट याच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा सवाल यांनी याआधी पत्रकार परिषदेत केला.