शरद पवार-मुख्यमंत्री बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

sharad-pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बारामतीमधील इनोव्हेशन सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे व मुख्यमंत्री बारामतीला जाणार असल्याचे समजते.  केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबत ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तर पवार यांनी पुणे दौऱ्यात टीका के ली होती. याबाबत महाविकास आघाडी एकजुटीने उत्तर दिले जात नाही व त्याची गरज असल्याचा सूर शिवसेना व राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी लावला. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp president sharad pawar chief minister uddhav thackeray on wednesday akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या