मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या कारकीर्दीस मंगळवारी ५५ वर्षे पूर्ण झाली. ५५ वर्षांपूर्वी याच दिवशी पवार हे विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर अखंड त्यांनी खासदारकी-आमदारकी व विविध पदे भूषविली आहेत. शरद पवार हे ५५ वर्षांपूर्वी याच दिवशी बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट माध्यमातून दिली आहे. या काळात पवार यांनी मंत्री, मुख्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषविली आहेत. संसदीय कारकीर्दीत विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद पवारांनी भूषविले आहे.
