मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात विलिनीकरण होणार नाही. विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पक्ष संघटना मजबूत करुन मोठ्या उमेदीने पुढे जायचे आहे. पूर्ण ताकतीने पक्ष उभा करायचा आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींसह पदाधिकरी उपस्थित होते.

दिवगंत अजित पवार यांच्या सोबत आमची विलिनीकरणाची चर्चा झाली होती. त्यांच्या निधनानंतर विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. विलिनीकरणाचा विषय बंद आहे. त्यामुळे पक्षाला मोठ्या उमेदीने पुढे नेण्यासाठी, पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याचा निर्णय झाला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा राहणार आहोत. शरद पवार यांचे नेतृत्व आणि त्यांचाच चेहरा घेऊन आम्ही महाराष्ट्रभर जाणार आहोत. असे शिंदे यांनी सांगितले. १५ ऑगस्टनंतर सरकारविरोधात राज्यभरात जागृती मोहीम सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्या्ंनी दिली.

रोहित पवार यांची नाराजी दूर करू – शिंदे

आमदार रोहित पवार माध्यमांशी काय बोलले, काय सांगितले आहे, ते मला माहीत नाही. पण, आम्ही पक्षाच्या शिस्ती राहून एकत्र काम करू. त्यांची काही नाराजी असेल तर दूर करून भविष्य काळामध्ये आक्रमकपणे आंदोलने करणार आहोत. पदाधिकाऱ्यांसाठी एक शिबिर आयोजित करणार आहोत. नीट पेपर फुटीचा प्रश्न आहे, इंधन दरवाढ, महागाई आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून पक्ष मजबूत करण्यात येईल. पक्षाच्या चौकटीमधूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही शिंदे यांनी बोलताना सांगितले. आजच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित असल्याने त्यावरून चर्चा सुरू झाली होती.

च्या पाठीशी आहे. जनतेच्या माध्यमातून उठाव करून सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.