आमदारकीची शिफारस रद्द

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे.

विधान परिषदेवरील रखडलेल्या १२ सदस्यांची नियुक्ती लवकर करावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या वेळी राज्यपालांना नियुक्तया लवकर कराव्यात म्हणून विनंती पत्र देण्यात आले. तसेच राज्यपालांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात  सादर करण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीत एक बदल करण्याचे पत्र देण्यात आले.

‘निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शक्यतो शिफारस करू नये अशी नवीन माहिती समोर आली आहे. त्याची आम्ही शहानिशा करीत आहोत. त्यात तथ्य आढळल्यास दुसऱ्या नावाची शिफारस के ली जाईल, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी के ले. याच निकषाने राष्ट्रवादीने के लेले  शिफारस यशवंत भिंगे व शिवसेनेने शिफारस के लेल्या उर्मिला मांतोडकर यांच्या नावांवर

फुली मारायला लागेल.  हे दोघेही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.

राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीच्या मुद्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत मोर्चे काढले. तसेच जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आदी मंत्र्यांवर टीका के ली. शेट्टी यांचा बदललेला रोख लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारकीची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ नावांच्या यादीत एक बदल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावालाही आक्षेप घेतला जाण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त

के ली जाते. राज्यपाल कोणती भूमिका घेतात यावर खडसे यांच्याबाबत  निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीबरोबर झालेल्या समझोत्यातून आमदारकी देण्याचे मान्य के ले होते. यामुळे मेहरबानी म्हणून आपल्या पक्षाला आमदारकी देण्यात येत नव्हती, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.