मुंबई : वकील नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विधि व न्याय मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने १० जानेवारी रोजी गोखले यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. गोखले यांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तीची संख्या ६६ झाली आहे.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

मालेगाव येथे २००८ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावेळी गोखले यांनी पुरोहितची बाजू मांडली होती. न्यायवृंदाच्या १० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत गोखले यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयात ६५ न्यायमूर्ती कार्यरत होते. गोखले यांच्या नियुक्तीनंतर ही संख्या ६६ झाली आहे.