महाराष्ट्रातही ‘नीट’परीक्षा मोडीत काढा!

नीटमध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तमिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रातही वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा मोडीत काढून पूर्वीप्रमाणेच राज्य मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेतील गुणांवर हे प्रवेश देण्यात यावेत, अशी भूमिका राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने घेतली आहे. ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे.

नीटमध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे समोर आले आहे. महागड्या खासगी शिकवण्या लावणे गरीब विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. परिणामी ग्रामीण व सामान्य कु टुंबांतील विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित रहात आहेत. शिक्षणातील ही असमानता दूर करण्यासाठी नीट परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे राज्य मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय प्रवेश सुरू करावेत, अशी त्यांनी मागणी के ली.

गृहनिर्माण संस्थांमध्ये महिला सुरक्षारक्षक असावेत 

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चितेंचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरांतील गृहनिर्माण संस्थांमध्ये पुरुष सुरक्षारक्षकांबरोबर महिला सुरक्षारक्षक ही असावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neet exam in maharashtra too congress demands cm akp