लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डतील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी रविवारी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
traffic diversion Pune city Shri Ganesh Jayanti Chhatrapati Shivaji Road
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द

रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी १.०५ दरम्यान मध्य रेल्वेच्या पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य मार्गिकेवर, कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक/भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाऊन मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ आणि दुपारी १.१५ वाजता कर्जत येथून सुटणारी खोपोली लोकल, सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० वाजता खोपोली येथून कर्जत जाणारी लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

सीएसएमटी येथून सकाळी ९.२७ ते सकाळी ११.१४ या वेळेत निघणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल नेरळ स्थानकावर थांबविण्यात येतील. सकाळी ११.१९ ते दुपारी १ या वेळेत सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील.

गाडी क्रमांक ११०१४ कोईम्बतूर- एलटीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १२.४० या वेळेत लोणावळ्यात थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२४९३ पुणे – हजरत निजामुद्दीन वातानुकूलित एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२१६४ चेन्नई- एलटीटी एक्स्प्रेसच पुणे विभागात थांबवण्यात येतील. दुपारी १२.५० वाजल्यानंतर या रेल्वेगाड्या लोणावळा येथे पोहचतील.

Story img Loader