वाडियाकडून साक्षीदारांची नावे सादर

अभिनेत्री प्रीती झिंटाने केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी उद्योगपती नेस वाडियाने बुधवारी आपल्या बाजूच्या नऊ साक्षीदारांची नावे पोलिसांना सादर केली.

अभिनेत्री प्रीती झिंटाने केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी उद्योगपती नेस वाडियाने बुधवारी आपल्या बाजूच्या नऊ साक्षीदारांची नावे पोलिसांना सादर केली. या सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर नेसवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडियावर विनयभंगाचे आरोप केल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी वाडियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या आरोपांना पुष्टी मिळावी यासाठी प्रितीने अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना उद्योगपती नेस वाडियाने बुधवारी पोलिसांना पत्र देऊन आपल्या नऊ प्रत्यक्षदर्शीची नावे सादर केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ness wadia gives names of 9 witnesses