मुंबई : मुंबईत बुधवारी १,५०४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १,६४५ रुग्ण करोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी शहरात १,२९० रुग्ण आढळले होते.

मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी ८४ वर्षीय रुग्ण पुरुष असून त्याला दीर्घकालीन मूत्रविकार होता. दुसरा रुग्ण ६४ वर्षीय महिला असून तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दीर्घकालीन आजार होते. तर तिसऱ्या ३७ वर्षीय रुग्णास यकृताचा दीर्घकालीन आजार होता. बुधवारी बाधित आढळलेल्या रुग्णांपैकी ६० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्यापैकी १८ जणांना प्राणवायूची आवश्यकता आहे. सध्या ६८१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून एकूण ११ हजार ८४४ उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्यात ६७४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात बुधवारी ६७४ नवे करोना रुग्ण आढळले. यामध्ये ठाणे २५१, नवी मुंबई १९०, कल्याण – डोंबिवली १०१, मीरा – भाईंदर ६०, ठाणे ग्रामीण ३९, उल्हासनगर १५, भिवंडी १० आणि बदलापूर पालिका क्षेत्रात आठ रुग्णांचा समावेश आहे.  तर ठाणे महापालिका क्षेत्रात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद  करण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ही ५ हजार ५८५ आहे.