मुंबई विद्यापीठात नवे अभ्यासक्रम, संशोधनाला चालना

मुंबई विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षांत विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षांत विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. त्याचबरोबर अनेक उद्ययोन्मुख, आंतरविद्याशाखीय आणि ट्रान्स डिसिप्लनरी संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला असून प्रगत संशोधन आणि अभ्यासासाठी विद्यापीठात ‘एमयू एक्सलेटर सेंटर’ची स्थापना केली जाणार आहे.

 या केंद्राच्या माध्यमातून अत्यंत प्राचीन संस्कृती, मानवनिर्मित साहित्य, बायोमेडिकल, अणुऊर्जा, भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी आणि शास्त्रोक्त संशोधनासाठी हे केंद्र असेल. या केंद्रातील सुविधांचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादित न ठेवता सर्व विद्यार्थी, संशोधक आणि शास्त्रज्ञांना उपलब्ध होऊ शकेल याचे नियोजन विद्यापीठामार्फत केले जाणार आहे.

 याचबरोबर ट्रान्स डिसिप्लनरी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आगामी कार्यक्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या विविध केंद्रांत पीएचडी अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालघर आणि रायगडमध्ये विद्यापीठ उपपरिसराची स्थापना केली जाणार असल्याचेही विद्या परिषदेत मंजूर केले आहे. 

नवीन अभ्यासक्रम

  • बीकॉम/ बीबीए/ बीएमएस इन मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
  • बीकॉम/ बीबीए/ बीएमएस इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स स्टडीज
  • बीकॉम/ बीबीए/ बीएमएस इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट
  • बीएस्सी इन आर्टिफिशिअल इंटेलिजंस अँड स्पोर्ट्स अनॅलिटिक्स
  • बीएस्सी इन डेटा सायन्स अँड  स्पोर्ट्स स्टडीज
  • एमबीए (इनोवेशन, आंत्रप्रिन्युअरशिप अँड व्हेंचर डेव्हलमेंट)
  • सर्टिफिकेट कोर्स इन गार्डिनग अँड नर्सरी मॅनेजमेंट
  • सर्टिफिकेट कोर्स इन ऑर्गेनिक फार्मिग
  • सर्टिफिकेट कोर्स इन कल्टिव्हेशन ऑफ स्पाईस प्लांट
  • पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन बायोडायव्हर्सिटी असेसमेंट अँड कन्झर्वेशन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New curriculum mumbai university driving research ysh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही