सुशांत मोरे

नव्या वर्षात बेस्ट, रेल्वे आणि एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुकर होणार आहे. बेस्ट उपक्रमाची दुमजली वातानुकूलित बस, मोबाइल ॲपआधारित आरक्षित होणारी टॅक्सी सेवा, तर राज्यात एसटीच्या तीन हजारांहून अधिक साध्या बस आणि १४८ वातानुकूलित शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. याशिवाय मध्य रेल्वेवर नेरूळ – उरण मार्गावरील खारकोपर – उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नेरुळ – उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नवे दिघा स्थानकही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) नव्या वर्षात प्रवाशांना रेल्वेबरोबरच बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांचे तिकीट काढता यावे यासाठी एकच सामायिक कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वीज वापराची अचूक माहिती मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
pune metro station marathi news, pune metro marathi news
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा

हेही वाचा >>>मुंबई: नायर दंत रुग्णालयात लवकरच अद्ययावत सुविधा; नवी इमारतीमधील कारभार महिनाभरात होणार सुरू होणार

बेस्टची दुमजली बस
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने येत्या काही वर्षात आपल्या ताफ्यात ९०० दुमजली वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत या दुमजली बसचे ऑगस्ट २०२२ मध्ये लोकार्पण करण्यात आले होते. बेस्टच्या ताफ्यात १४ जानेवारी २०२३ पर्यंत ५० दुमजली वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. यांची कलमर्यादाही संपत आली आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. नव्या दुमजली बसची प्रवासी आसन क्षमता ७६ इतकी आहे. सीसी टीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष व्यवस्था, दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे आणि ते उघड-बंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे असणार आहे. या बसचे चार्जिंग ८० मिनिटांत होते.

बेस्टची टॅक्सी सेवा
मोबाइल ॲप आधारित आरक्षित केल्या जाणाऱ्या ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यानी निर्माण केलेल्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. नव्या वर्षात बेस्टची मोबाइल ॲपआधारित ई-वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू होत असून बेस्टच्या ताफ्यात जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी दाखल होणार आहेत. या टॅक्सीवर बेस्टचा लोगो असेल. वैयक्तीकरित्या प्रवासाबरोबरच शेअर टॅक्सी म्हणूनही त्या उपलब्ध होतील.

साध्या एसटीची संख्या वाढणार
गेल्या चार – पाच वर्षांपासून प्रवाशांना नव्या बस गाडयांची प्रतीक्षा आहे. एसटी महामंडळाने राज्यातील प्रवाशांसाठी नव्या वर्षात साध्या प्रकारातील सुमारे तीन हजार २०० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन हजार बसच्या सांगाड्याच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. या बसगाड्यांमध्ये विमानाप्रमाणे पुश बॅक आसन व्यवस्था असेल. या बस टप्याटप्याने डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. तर एक हजार २०० बसपैकी काही बसगाड्या ताफ्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा >>>तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान मेकअप रुममध्ये कसा? रुग्णवाहिकेला उशीर का झाला? तुनिषाच्या आईने व्यक्त केला हत्येचा संशय

आणखी शिवाई बस येणार
इंधनावरील खर्च कमी करणे, प्रदुषणमुक्त प्रवासासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्याने येणार असून पहिल्या टप्यात ५० बस, तर दुसऱ्या टप्प्यात १०० बस ताफ्यात दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर चालवण्यात येत आहेत. आता उर्वरित १४८ बस नव्या वर्षात येतील. मुंबई, ठाणे – पुणे मार्गावरही एकूण १०० शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे. कंपन्यांकडून या बस एसटी महामंडळाला मिळण्यास बराच विलंबही झाला आहे.

नेरुळ-उरण प्रवाशांना दिलासा
नेरुळ – बेलापूर – उरण उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्यात येत असून या मार्गावरील प्रवाशांना नव्या वर्षात दिलासा मिळणार आहे. या उनपगरीय मार्गावरील खारकोपर – उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२३ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नेरूळ – बेलापूर – खारकोपर – उरण रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. एकूण २७ किमी लांबीचा हा मार्ग असून यातील नेरूळ – बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांंच्या सेवेत दाखल झाला. सध्या पहिल्या टप्यातील मार्गावर लोकल प्रवासासाठी प्रवाशांना २० मिनिटे लागतात.

दिघा स्थानकाची भर
ट्रान्स हार्बर मार्गांवरील ठाणे – ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा स्थानक नव्या वर्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हिसी) हे काम करीत आहे. ऐरोली – कळवा उन्नत मार्ग प्रकल्पातील दिघा स्थानक हा पहिला टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात दिघा रेल्वे स्थानकाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र हे काम रखडले होते. या स्थानकाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. या स्थानकाच्या कामाला आधी मार्च २०२० पर्यंत आणि त्यानंतर मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

हेही वाचा >>>Heeraben Modi Passes Away: नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली

सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच सामायिक कार्ड
प्रवासात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मदतीने एकच सामायिक कार्ड सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने क्षेत्र सर्वेक्षण (फील्ड सर्वे) पूर्ण केले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या सामायिक कार्डमधून तिकीटाचे पैसे अदा करुन बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेतूनही प्रवास करू शकतो. सध्या बेस्टकडे एकच सामायिक कार्डची सुविधा असून अन्य परिवहन सेवांमध्ये ही सुविधा नसल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

स्मार्ट मीटरची सुविधा
वीज वितरण यंत्रणा अत्याधुनिक करण्यासाठी मुंबईत बेस्ट उपक्रम ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध होणार असून त्यामुळे वीज वापराची अचूक माहितीही ग्राहकांना मिळणे शक्य होणार आहे. यासाठी मोबाइल ॲपही वीज ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. एखाद्या महिन्यात विजेचा वापर किती होतो, याची माहिती ग्राहकाला मिळणार आहे. तसेच स्मार्ट मीटरमध्ये प्रिपेड मीटर सुविधाही घेऊ शकतात. विद्युतपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तात्काळ विद्युत विभागाच्या नियंत्रण कक्षाला समजण्यासही मदत होणार आहे.