scorecardresearch

मुंबई: नव्या वर्षात चार उपनगरीय स्थानकात सुविधांची रेलचेल

प्रवाशांना स्थानकापर्यंत सहजपणे पोहोचता यावे आणि प्रवास सुकर होण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, खार आणि मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे.

मुंबई: नव्या वर्षात चार उपनगरीय स्थानकात सुविधांची रेलचेल
(संग्रहित छायचित्र)

प्रवाशांना स्थानकापर्यंत सहजपणे पोहोचता यावे आणि प्रवास सुकर होण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, खार आणि मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. स्थानक परिसर आणि हद्दीत प्रवासी सुविधांसह स्थानकाच्या इमारतीची पुर्नबांधणी करण्यावर भर देण्यात येत आहे.

हेही वाचा>>>मुंबई: खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रतिवादी संघटनेला ‘खादी’ आणि ‘चरखा’ वापरण्यास मनाई

चर्नी रोड स्थानक-:
चर्नी रोड स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात जुने स्थानक आहे. सर्व लोकल गाड्या या स्थानकात थांबतात. त्यामुळे प्रवाशांची बरीच वर्दळ स्थानकात असते. प्रवाशांची फलाटावरील आसनव्यवस्था, चांगली प्रसाधनगृहे येथे उपलब्ध केली जाणार आहेत. स्थानकाची रंगरंगोटी करुन ते अधिक आकर्षक केले जाणार आहे.स्थानक इमारतीची पुर्नबांधणीही केली जाणार असून या कामाला सुरुवात झाली आहे. स्थानकाला जोडून सहा मजली स्थानक इमारत उभारली जाणार आहे. खाद्यपदार्थांची दुकाने, अपंगांसह अन्य प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, तिकीट खिडक्या, कर्मचाऱ्यांसाठी विश्राम कक्ष, तिकीट तपासनीस आणि स्टेशन मास्तर कार्यालय असेल. रेल्वे स्थानकाच्या आतील इतर संरचनेत बदल केला जाणार आहे. या कामाला सुरुवात झाली असून २०२३ मध्ये ही कामे पूर्ण होतील.

हेही वाचा>>>“जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्यासाठी …”- महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं विधान!

ग्रॅण्ट रोड स्थानक-:
दक्षिण मुंबईतील सर्वात जुन्या अशा ग्रॅण्टरोड रेल्वे स्थानकातही काही बदल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. हे स्थानक १५० वर्षाहून जुने आहे. या जुन्या स्थानकात चार फलाट असून चर्चगेट व विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या व जलद लोकल थांबतात. सर्वात जुन्या अशा स्थानकात बदल करतानाच आणखी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी पाच कोटी २३ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. स्थानक इमारतीची पुर्नबांधणी केली जाणार असून तेथे दोन मजली इमारत बांधण्यात येईल. अन्य सुविधांची भर येत्या नवीन वर्षात या स्थानकात पडेल.

घाटकोपर स्थानक :-
मेट्राे आणि लाेकलमुळे घाटकाेपर स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या स्थानकापर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावे यासाठी विविध सुविधा मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून दिल्या जाणार आहेत. घाटकोपर स्थानकात ७५ मिटर लांब आणि १२ मिटर अरुंद पादचारी पूल आणि पूर्वेला ४५ मिटर लांब आणि पंधरा मिटर अरुंद स्थानकाला जोडणारा डेक तयार केला जाणार आहे. मेट्रो स्टेशन आणि सर्व पादचारी पुलांना जोडणारा हा एलिव्हेटेड डेक असेल. या स्थानकात एकूण तीन पादचारी पूल, तसेच आकाशमार्गिका (स्कायवॉक) बांधण्यात येतील. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कामे पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०२३ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा>>>मुंबईः पोलिसांशी वाद घालणाऱ्या तरुणाला अटक

खार स्थानक :-
पश्चिम रेल्वेवरील खार स्थानक गजबजलेले स्थानक म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील गाड्या येथे थांबतात. या स्थानकातून दररोज ५२ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. खार स्थानकात प्रवाशांना थेट पोहोचता यावे यासाठी एलीव्हेटेड डेक, होम प्लॅटफॉर्म याबरोबरच पादचारी पूल यांसारख्या विविध सुविधा खार स्थानकात प्रवाशांना मिळणार आहेत. या स्थानकासाठी सध्या एलीव्हेटेड डेकचे काम सुरु असून ते ५० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून या स्थानकाचा विकास केला जात आहे. स्थानकाच्या पश्चिमेला दहा मीटर रुंदीचा डेक होणार असून त्यावर तिकीट खिडकीही असेल. याशिवाय २२.५० मीटर रुंदीचा आणखी एक डेक होणार असून तो स्थानकातील सर्व पादचारी पुलांना जोडला जाणार आहे. खार स्थानकाच्या पश्चिम दिशेला नवीन फलाटही बांधण्यात येत आहे. तेथून प्रवाशांना स्थानकात थेट जाता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी फलाटावरील दुकाने, तसेच स्थानकातील एटीव्हीएम यंत्रणा अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येणार आहे. स्थानक इमारतीच्या दुरुस्तीबरोबरच पूर्व आणि पश्चिम रेल्वे हद्दीत मोकळी जागा निर्माण केली जाणार आहे. मार्च २०२४ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 18:20 IST

संबंधित बातम्या