सिद्धेश्वर डुकरे

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी नवीन ‘एम-३’ जनरेशनची इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे (ईव्हीएम) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूरु येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बीईएल) कंपनीने तयार केलेली यंत्रे राज्यात आणण्यात सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय गुंतले आहे.

Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
dhule fake voter id marathi news, dhule fake voter card marathi news
धुळ्यात बनावट मतदार ओळखपत्र तयार करणारा फोटो स्टुडिओ

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीची तयारी सुरू आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या अगोदरच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रे ही ‘एम-१’ या जनरेशनची वापरली गेली होती. ठरावीक कालावधीनंतर जुनी ईव्हीएम यंत्रे बाद करून त्याऐवजी नवीन यंत्रे वापरली जातात. ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी मतपत्रिका (बॅलेट युनिट) दोन लाख १५ हजार, नियंत्रण (कंट्रोल युनिट) एक लाख ३३ हजार आणि मतदार पडताळणी छापील पत्रिका( व्हीव्हीपॅट) एक लाख ३५ हजार इतकी आवश्यक आहे. राज्यात एक लाख १२ हजार मतदान केंद्रे (बूथ) आहेत. त्यानुसार ही संख्या निर्धारित केली आहे. आतापर्यंत ‘एम-३’ जनरेशनची नवीन बॅलेट युनिट ७० हजार, कंट्रोल युनिट ५० हजार, तर व्हीव्हीपॅट एक लाख ८ हजार राज्याला मिळाली आहेत. उर्वरित यंत्रे पुढील कालावधीत मागवली जातील. राज्यात १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रे मागवली जातील. सध्या मागविण्यात आलेल्या यंत्रांची प्रथम स्तर तपासणी (एफएलसी) १ जूलैपासून सूरू होणार आहे. यासाठी राज्यातील राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जाणार आहे. ही यंत्रे तयार करणाऱ्या ‘भेल’ या कंपनीचे जाणकार अभियंते या नवीन यंत्रांचे प्रात्यक्षिक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवणार आहेत. यंत्रासंदर्भात सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर ही सर्व यंत्रे एका विशिष्ट ठिकाणी (स्ट्राँग रूम) देखरेखीत ठेवली जाणार आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून या मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी केली जाणार आहे. यंत्राबद्दल राजकीय पक्षाच्या कोणत्याही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. त्या वेळी या यंत्रांची सर्व माहिती अवगत केली जाणार आहे. – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव