मुंबई : मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) नुकताच प्राप्त झाला. याबाबतची माहिती मुंबई पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली आहे. या ई – मेलमध्ये अफगाणिस्थानचे नेते सिराजुद्दीन हक्कानीच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकन यंत्रणा ‘सीआयए’कडून संदेश आल्याचे भासवण्यात आले आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवून धमकीबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. यापूर्वी  मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Indians in Cambodia cyber scams
सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या ७५ भारतीयांची कंबोडियातून सुटका; ६ महिन्यात ५०० कोटी लुटले
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!