मुंबईः राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आठ राज्यांमधील विविध ठिकाणी गुरूवारी छापे टाकले. त्यात राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडी येथील ठिकाणांचा समावेश आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. राज्यात या कारवाईदरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेऊन एनआयएने त्यांची चौकशी केली.

जम्मू आणि काश्मिर, आसाम, महाराष्ट्र, गुजरात व उत्तर प्रदेश या चार राज्यांमधील सुमारे १९ ठिकाणी एनआरएने एकाच वेळी छापे टाकून शोध मोहिम राबवली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेलया संशयावरून एआयएने संबंधीत ठिकाणी छापे टाकले. राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडी येथेही विविध ठकाणी एनआयएने छाप टाकले. त्यात अमरावती व संभाजी नगर यथून प्रत्येकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय ठाणे जिल्हयातील भिवंडीमधूनही ४५ वर्षीय व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. या संशयितांचे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा एनआयएला संशय आहे.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

हेही वाचा >>>देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!

एनआयएने गुरूवारी पहाटेपासूनच देशभरात कारवाईला सुरूवात केली होती. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेद्वारे देशभरात तरूणांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू होता. त्या अनुषंगाने काही संशयीतांविरोधातही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयीत दस्तावेज व संगणक उपकरणेही एनआयएन जप्त केली आहेत. नेमक्या कोणत्या घातपाती कारवायांसाठी जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना तरूणांना संघटनेत सामील करून घेत होती याबाबत एनआयए तपास करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच एनआयएने पाच राज्यांमधील २६ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत शेख सुल्तान सलाहउद्दीन अयुब ऊर्फ अयुबी याला अटक करण्यात आले होते.

Story img Loader