अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल

अँटिलिया स्फोटंक प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

antilia-bomb-scare-case-nia-arrest-mumbai-crime-branch-sunil-mane
(संग्रहित फोटो)

अँटिलिया स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मासह अन्य ८ जण एनआयएच्या ताब्यात आहेत.

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली आहे.

यापूर्वी ४ ऑगस्टला आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्यांचा अवधी मागितला होता. एनआयए अँटिलाया स्फोटकं प्रकरणासोबत मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास करत आहे. आज कोर्टात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nia submits its chargesheet in antilia bomb case rmt

ताज्या बातम्या