मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी सुनवली आहे. पांडे यांनी आपण कोणत्याही प्रकारचे दूरध्वनी अभिवेक्षण (टॅपिंग) केले नसल्याचे न्यायालयाला सांगितलं. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडी तपास करत आहे. या अटकेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच निलेश राणेंनी या अटक प्रकरणावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

नेमकं प्रकरण काय?
पांडे यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली होती. पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. या कंपनीला २०१० ते २०१५ या कालावधीत एनएसई सर्व्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे.दूरध्वनी अभिवेक्षण करण्याच्या कामासाठी आरोपी कंपनीला अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

निलेश राणेंची टीका
पांडे यांना अटक झाल्यानंतर निलेश राणेंनी ट्वीटरवरुन ठाकरेंवर टीका केली आहे. “मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडेंसारखे जे उद्धव ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते सगळे देशोधडीला लागले,” असं ट्वीट निलेश राणेंनी केलंय. तसेच याच ट्वीटमध्ये पुढे निलेश राणेंनी, “उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते,” असंही म्हटलंय.

याच प्रकरणावरुन अपक्ष आमदार रवी राणा यांनीही पांडे यांच्या अटकेमुळे आपल्याला ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया नोंदवली. पांडे यांनीच आपल्याला उद्धव ठाकरे आणि महविकास आघाडी सरकारच्या आदेशानुसार हनुमान चालिसा प्रकरणामध्ये तुरुंगात डांबलं होतं असंही रवी राणा म्हणाले.