मुंबई : विविध क्षेत्रांत विधायक आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या सामान्य नागरिकांमधील नऊ स्त्रियांचा ‘लोकसत्ता’तर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गौरव केला जाणार आहे. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’साठीची निवडप्रक्रिया आता सुरू करण्यात येणार असून त्यासाठी कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठवण्याचे आवाहन वाचकांना करण्यात येत आहे.

अनेक स्त्रिया लहान वा वैयक्तिक स्वरूपात एखादे काम सुरू करून इतर अनेकांना त्यात सामावून घेतात. एखाद्या आगळय़ावेगळय़ा, पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने गाजवलेले कर्तृत्त्व, भांडवल वा माहिती हाताशी नसतानाही सुरू केलेल्या व्यवसायातून पुढे इतर स्त्रियांसाठी निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, ‘सावित्रीच्या लेकी’ घडवण्यासाठी शिक्षणाचा उभारलेला यज्ञ, विज्ञान-तंत्रज्ञानात गाठलेली उंची किंवा अनेकांना एकत्र आणत उभारलेले सामाजिक कल्याणकारी काम.. हे सर्व प्रेरणादायीच. राज्यभरातून अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्त्रियांची नामांकने मागवून निवडक नऊ स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चा सन्मान प्रदान केला जातो. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. 

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

आलेल्या नामांकनांमधून तज्ज्र्ञ परीक्षक समिती नऊ दुर्गाची निवड करते. नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे, तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळय़ात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाणार आहे.

माहिती कुठे पाठवाल?

माहिती loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’साठी असा स्पष्ट उल्लेख करावा. माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्गाची निवड करण्याच्या काळात ‘लोकसत्ता’कडून त्याविषयी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार वा दूरध्वनी संवाद केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुरस्कारप्राप्त दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये थेट २६ सप्टेंबरपासून प्रसिद्ध केली जाईल.

माहितीत काय असावे? सामान्य नागरिकांमधील जी कर्तृत्त्ववान स्त्री ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’साठी पात्र ठरू शकेल असे आपल्याला वाटते अशा स्त्रीचे नाव सुचवून वाचक तिची माहिती पाठवू शकतात. ही माहिती ‘लोकसत्ता’कडे सुमारे ५०० शब्दांत आणि केवळ मराठीतच लिहून वा ई-मेलवर पाठवावी. इंग्लिशमध्ये पाठवलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. अर्जात संबंधित स्त्रीचे वेगळेपण, तिचा संघर्ष, विधायक काम आणि प्रेरणादयित्त्व याची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्या स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडीही पाठवणे आवश्यक. 

हे महत्त्वाचे

  • सामाजिक कार्य, उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, शेती वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्त्ववान स्त्रियांची माहिती पाठवता येईल.
  • माहिती फक्त मराठीत, नोंदी स्वरूपात आणि एकदाच पाठवावी.
  • संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.