राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीकडून चौकशी केली जात आहे. मात्र या चौकशीच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांच्या चौकशीसंदर्भात प्रतिक्रिया देताना, ”२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत,’ असं म्हटलंय. मात्र संजय राऊतांनी दिलेल्या या प्रतिक्रियेला भाजपाचे आमदार नितेश राणेंनी कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलंय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणासह भाजपाला इशारा दिलाय. ”२०२४ नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. यावरुन राऊत यांच्यावर नितेश राणेंनी निशाणा साधलाय. “जनाब संजय राऊत आपण सत्तेच्या लाचारीत ९३ मध्ये झालेले स्फोट कदाचित विसरले असाल. या हल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते व ७१३ मुंबईकर जखमी झाले होते. या हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार म्हणून दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं होतं,” असं नितेश राणे म्हणालेत.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

दाऊदचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं, “तेव्हाही आपलेच काँग्रेसचं सरकार हे सत्तेत होतं. या देशद्रोही दाऊदचा भागिदार म्हणून नवाब मलिक यांचं नाव समोर आलंय. या सर्वाचा तुम्ही निषेध करायला हवा होता पण तुम्ही नवाब मलिकांना वाचवण्यासाठी पुढे आला आहात. हा खरं म्हटलं तर हा देशद्रोहच आहे. यापुढे तुम्ही आपली मुंबई म्हणू नका कारण सत्तेच्या लाचारीखाली आपण सगळच विसरला आहात,” असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

मागील पाच तासांहून अधिक काळ नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरु आहे. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ”आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही.” असं म्हटलं आहे.