केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जसे त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे ओळखले जातात तसेच ते त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे आणि गंमतीदार किश्श्यांमुळेही ओळखले जातात. अनेकदा भाषणांमध्ये त्यांच्या हजरजबाबी उत्तरांमुळे आणि अशाच काही किश्श्यांमुळे उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याचं पाहायला मिळालं आहे. आज ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना अनेक किस्से सांगितले. यामध्ये दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासमवेत असताना घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला.

देशात एकपक्षीय संसद व्यवस्था निर्माण झालीये का?

केंद्रीय पातळीवर संसदेमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असून मोठ्या पक्षाच्या खासदारांची संख्या ३००च्याही वर आहे. त्यामुळे देशात एकपक्षीय संसद व्यवस्था निर्माण होत आहे का? अशी विचारणा नितीन गडकरींनी केली असता त्यांनी त्यासंदर्भातल्या उत्तरात प्रमोद महाजन यांच्यासमवेत असतानाचा एक प्रसंग सांगितला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ते सामना बघायला गेलेले असताना हा प्रसंग घडला होता.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

“क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं”

“क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. मी एकदा ब्रेबॉर्न स्डेडियमवर प्रमोद महाजन यांच्यासह मॅच बघायला गेलो होतो. चहापानापर्यंत भारताच्या विकेट्स पडत होत्या. त्यावेळी भाजपा नुकतीच निवडणूक हरली होती. मी तेव्हा तरुण होतो. ते मध्येच उठून मला म्हणाले की ‘मी घरी जातो. मी जिथे जातो, तिथे पराभवच होतो. आता भारत हरतोय. त्यामुळे मी निघून जातो’. आम्ही तिकीट घेतलं होतं. तर आम्ही म्हणालो की ‘तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, आम्ही पूर्ण सामना पाहणार’. तुम्हाला विश्वास बसणार नाही की ते जसे गेले, सामना फिरला आणि भारत जिंकला. कोण का जिंकला आणि कोण का हरला हे समजत नाही. ही मायबाप जनता आहे. त्यांचा अधिकार आहे. जनता जो निर्णय देईल तो स्वीकारावा लागतो”, असं गडकरी यावेळी म्हणाले.

Video: कितीही रस्ते बनवले तरी वाहतुकीची समस्या कमी का होत नाही? गडकरींनी सांगितला उपाय; म्हणाले…!

भाजपा आक्रमक का आहे?

दरम्यान, यावेळी भाजपा आक्रमक धोरण का अवलंबून आहे? यासंदर्भात विचारणा केली असता गडकरींनी त्यावर उत्तर दिलं. “माध्यमं डबल ढोलकीसारखी वागतात. जर नेते कन्स्ट्रक्टिव्ह बोलले, तर तुम्ही म्हणता की विरोधकांमध्ये दम नाही. जास्त आक्रमक झाले, तर तुम्ही म्हणता विरोधक बेजबाबदार आहेत. दोन्ही बाजूंनी वाजवणारे इतके आहेत, की त्यामुळे समस्या येते. त्याला काय करणार? हळूहळू आपल्या लोकशाहीमध्ये संवेदनशील बनताना आपण प्रगल्भ होत कामगिरीच्या आधारावर समोरच्याला जोखायला हवं. कामगिरीचं परीक्षण व्हायला हवं”, असं ते म्हणाले.