मीटर वाढवण्यासाठी रिक्षाचालक करीत असलेल्या बेकायदेशीर कृत्याविरोधात शिवसेना नेते नितीन नांदगावकर आक्रमक झालेत. मुलुंडमधील चेक नाक्यावरील एका रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा दररोज फोडणार असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला आहे.

मुलुंडमधील चेक नाक्यावरील रिक्षाचालकाच्या बेकायदेशीर कृत्याचं पितळ नांदगावकरांनी उघडं पाडले. रिक्षाचालकाला ताकिद देत त्यांनी रिक्षाची तोडफोड केली. तोडफोड केलेली रिक्षा मराठी माणसाची आहे.

मुंबईत ज्या ज्या ठिकाणी GST बटण असलेल्या रिक्षा दिसतील. त्या सर्व ठिकाणच्या रिक्षा रोज फोडणार. मुंबईत अशाप्रकारे GST बटण असलेल्या रिक्षा चालू देणार नाही. किती जणांवर गुन्हे दाखल करणार, जनतेची लुटमार थांबणार की नाही?” असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओद्वारे उपस्थित केलाय.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

नितीन नांदगावकरांची फेसबुक पोस्ट –

रिक्षा ….रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील प्रवासातील एक अविभाज्य भाग एक विश्वासाचे नाते पण त्यात आली बेईमानी ती सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी बनवली गेली आणि बघता बघता मुलुंड मधील चेकनाक्यावर सर्रास सर्वच रिक्षा मध्ये आले घोडा मीटर .
सर्व जाती धर्माची लोकं जेंव्हा आपल्याच लोकांना लुबाडायला लागली तर अशा वेळी जनतेने सुद्धा गप्प राहून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन विरोध केला पाहिजे .

जवळची भाडी नाकारायचे कारणच ते की लांबच्या भाड्यात घोडा मीटर दाबून हवे तेवढे पैसे उकळायचे बस हाच आमच्या मेहनतीचा धंदा जो बघता बघता सगळ्या मुंबईत फोफावला ….रिक्षा -टॅक्सी सगळेच तरबेज झाले आणि जो तो जनतेला लुबाडायला लागले . कारण जनतेला कधी पडलीच नाही जो तो आपल्या कामात व्यस्त. बस याचाच फायदा ह्या समाजकंटकांनी घेतला आणि मग सगळीकडे दिवसा दिवसाढवळ्या घोडा बटनचा वापर होऊ लागला ….

त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बटन लपवण्यासाठी केल्या गेल्या . पण हल्लीचे तरबेज रिक्षा वाले बटन वायपरच्या साठी असणारे बटन, लाईटसाठी असणारे बटन, अशा ठिकाणी #GST बटन लावू लागले … माणसे बघून पुड्या बांधायचा धंदा नावारूपाला आला आणि त्यात कधी पकडले गेले की हाता-पाया पडून गरीब चेहरा बनवून तर कधी दादागिरी करून वेळ मारून नेली पण बेईमानीचा धंदा बंद नाही केला हेच सत्य मुंबईत सगळीकडे दिसून येतंय …. आता आपण विचार करू की ह्यावर उपाय काय ? भरपूर आहेत आणि त्यासाठी कायदे आणि यंत्रणा सक्षम कराव्या लागतील पण तरीसुध्दा जेंव्हा प्रवृत्ती विकृती धारण करते तेंव्हा तो कॅन्सर होतो समाजासाठी आणि कॅन्सर ठीक करायचा असतो तेंव्हा त्यावरील उपाय देखील तेवढेच जालीम असतात तरच कॅन्सर मधून बाहेर पडता येते …..
सावधान मुंबईकर …..