मुंबई : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट व मालिका निर्माते नितीन वैद्य यांची रविवारी निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या वेळी गोंधळ होऊन सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन वैद्य यांच्यासह अलका एकबोटे आणि अनुपकुमार पांडे असे तिघांनी अर्ज दाखल केले होते. पण निवडणुकीच्या सभागृहात एकबोटे आणि पांडे यांना आधी प्रवेश नाकारण्यात आला. त्यावरून सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

 मतदार यादीच सदोष होती व सेवा दलाच्या घटनेच्या विसंगत अशा कार्यकर्त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा आक्षेप कार्यकर्त्यांनी घेतला. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्या कार्यशैलीला आक्षेप होता. मतदान न घेताच वैद्य यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा या निवडणुकीतील एक उमेदवार अलका एकबोटे यांनी आक्षेप घेतला. 

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
NCP Sharad Pawar group has filed its candidacy of Dhairyashil Mohite-Patil in Madha
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Supriya Sule Vs Sunetra Pawar
ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

देशातील २३ राज्यांमधील सेवा दलाच्या प्रतिनिधींनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. लोकशाही पद्धतीनुसार झालेल्या मतदान प्रक्रियेत वैद्य यांना २२८ मते मिळाल्याची माहिती  प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली. नितीन वैद्य हे गेली तीन दशके पत्रकारिता, चित्रपट व मालिका निर्माते म्हणून काम करतात. मावळते अध्यक्ष डॉ. गणेश देवी, कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील, पन्नालाल सुराणा आदींनी वैद्य यांचे अभिनंदन केले व वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र सेवा दलाचा विचार अधिक विस्तारेल, असा विश्वास व्यक्त केला.

लोकशाही पद्धतीनुसार निवडणूक होणार होती तर आम्हाला सभागृहात आधी प्रवेश का नाकारण्यात आला. जेव्हा सभागृहात सोडण्यात आले तेव्हा वैद्य यांची निवड जाहीर करण्यात आली होती. याबद्दल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी भारत सासणे यांच्याकडे जाब विचारला. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

– अलका एकबोटे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार

निवडणुकीच्या वेळी काही जणांनी वेगळा सूर लावला होता. पण सारेच आमच्या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सर्वाशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यावर आपला प्रयत्न राहील. तसेच राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय पातळीवर अधिक सक्रिय करण्यावर आपला भर राहील.

– नितीन वैद्य, नवनिर्वाचित अध्यक्ष