मुंबई : इंडिगोने २३ एप्रिलपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० हून अधिक नवीन मार्गांवर विमान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साप्ताहिक उड्डाणांची संख्या ४००पेक्षा अधिक झाली आहे.

नविन मार्गात आग्रा, कोलकाता आणि श्रीनगरसारख्या शहरांना नवी मुंबईशी जोडले आहे. नवी मुंबईचे उन्हाळी वेळापत्रक २४ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. आता गंतव्यस्थानांची संख्या १६ वरून ४६ पर्यंत वाढली आहे.

इंडिगोने रविवारपासून भावनगर ते नवी मुंबई दरम्यान दिवसातून दोनदा थेट विमानसेवा सुरू केली आहे. त्यामुळे गुजरातमधील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम झाली आहे. या मार्गावरील विमानसेवा इंडिगोच्या एटीआर विमानांद्वारे चालवली जाते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला इंडिगोने २३ एप्रिलपासून जामनगरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणाही केली होती. या नवीन विमानसेवांमुळे, इंडिगोची अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट, भावनगर आणि जामनगरसह गुजरातमधील सहा शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरुन साप्ताहिक १ हजार ४०० हून अधिक सेवा सुरू होतील.

या शहरांना जोडणार

आग्रा, अयोध्या, बागडोगरा, बेळगाव, चंदीगड, दीव, कन्नूर, कोलकाता, पाटणा, राजकोट, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम