आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ ; अटके पासून अंतरिम दिलासा नाही

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्य़ाच्या आधारे ‘ईडी’कडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

मुंबई : सिटी सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला.  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घरावर छापे टाकल्यानंतर तसेच चौकशीसाठी बोलावल्यानंतर अटकेच्या भीतीने अडसूळ यांनी आधी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ‘ईडी’चे समन्स रद्द करण्याची मागणीही केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच अटक टाळायची असल्यास कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा त्यांना दिली होती. त्यानुसार अडसूळ यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने सोमवारी त्यांच्या अर्जावर निर्णय देताना अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अडसूळ हे बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बँकेत ९८० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्य़ाच्या आधारे ‘ईडी’कडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No interim relief for sena leader anandrao adsul in bank fraud case zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या