मुंबई : अखिल भारतीय पर्यटन परवाना (एआयटीपी) असलेल्या प्रवासी बसमधील प्रवाशांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या कालावधीत संबंधित वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करू नये, असे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी परिपत्रक जारी करून दिले आहेत.

खासगी प्रवासी बस प्रवाशांना घेण्यासाठी अथवा उतरवण्यासाठी थांबवण्यात येते. त्यावेळी बसवर पोलीस किंवा परिवहन विभागातर्फे अवैध पार्किंगची कारवाई करण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी हा मुद्दा उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेतील नियमानुसार, अखिल भारतीय पर्यटन परवाना असलेल्या प्रवासी वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियमांतील अटींमधून वगळण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अखिल भारतीय पर्यटन परवाना असलेल्या प्रवासी बसमधील प्रवाशांना बसमध्ये उतरविणे किंवा चढविण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढ्या वेळेसाठी त्या वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करू नये, असे भीमनवार यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.