लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नगर येथे मॅकडोनाल्डमधील बर्गर आणि नगेट्समध्ये असलेल्या पनीर ऐवजी ‘चीज ॲनालॉग्स’चा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व मॅकडोनाल्ड्सह अन्य फास्टफूड विक्रेत्या कंपन्यांच्या शाखांची तपासणी सुरू केली होती. त्यानुसार मुंबईतील ३० आस्थापनांची तपासणी करून त्यांना सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस पाठविली आहे.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

चीज ॲनालॉग्स हे पनीरसाठी पर्याय म्हणून छुप्या पद्धतीने वापरले जाते. मात्र हे आरोग्याच्यादृष्टीने घातक समजले जाते. मात्र तरीही मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध फास्टफूड कंपनीने नगर येथील आपल्या शाखेत खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉग्स हा पदार्थ वापरत असल्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली. त्यामुळे मॅकडोनाल्डने पनीरचा वापर करण्यात येत असलेले खाद्यपदार्थ त्यांच्या यादीतून काढून टाकले होते. पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीज ॲनालॉग्स देऊन ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील मॅकडोनाल्ड व अन्य कंपन्यांच्या आस्थापनांवर २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान कारवाई सुरू केली होती. त्यात मॅकडोनाल्ड व अन्य कंपन्यांच्या मिळून ३० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात मॅकडोनाल्डच्या मुंबईतील १३ आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीत खाद्यपदार्थांचे २१ नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र या १३ ही आस्थापनांमध्ये निकष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्याने त्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले होते.

आणखी वाचा-पोलिसांच्या रजेचे रोखीकरण २४ तासांत पुन्हा सुरु!

मॅकडोनाल्डप्रमाणे मुंबईतील डॉमिनोज आणि केएफसीच्या प्रत्येकी ४ शाखा, पिझ्झाहटच्या ३, सबवे आणि बर्गर किंगच्या २, चाओस कंट्रोल कॅफेची एका शाखा अशा एकूण १७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तेथे १० खाद्यपदार्थांचे नमूने घेण्यात आले. मात्र मॅकडोनाल्डच्या १३ आणि अन्य कंपन्यांच्या १६ आस्थापनांना खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याचे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना तातडीने सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र आढाव यांनी दिली.