फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवावे, तसेच, परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थ्याने बस थांबवण्यासाठी हात दाखवल्यास त्याला बसमध्ये घ्यावे, अशा सूचना एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना केल्या आहेत.

हेही वाचा >>>तापसी पन्नू पहिल्यांदाच विनोदीपटात काम करणार

How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेतील गावापासून परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष बस सोडण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार बस चालवावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना येणे-जाणे सोयीचे होईल. तसेच, परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थी दिसल्यास व त्याने गाडी थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना बसमध्ये जागा करून देण्यात यावी. तसेच परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या परीक्षार्थीना एस. टी. महामंडळामार्फत आवश्यक ती सर्व मदत करावी. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार बस सोडताना अन्य प्रवाशांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा लेखी सूचना एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना केल्या आहेत.