मुंबई : माथेरानच्या मिनी ट्रेनचे पर्यटकांना कायमच आकर्षण असून या ‘राणी’ला गेल्या वर्षभरात पर्यटक आणि स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये सोमवार ते शुक्रवारी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये देशभराच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर विदेशातील पर्यटकही येत असतात. या पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेन कायमच आकर्षित करीत असते. या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोम डबाही (काचेचा पारदर्शक डबा) जोडण्यात आला आहे. स्थानिकांनाही या ट्रेनची खूप मदत होते. टाळेबंदीच्या काळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच काहींनी पर्यटनासाठी माथेरानमध्ये जाणे पसंत केले. परंतु बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे र्पयटकांचा हिरमोड होत होता. तसेच

स्थानिकांनाही नेरळ – माथेरान प्रवासासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू करण्यात आली.  वाढत्या प्रतिसादामुळे मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. 

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी

सध्या अमन लॉज आणि माथेरानदरम्यान मिनी ट्रेनच्या सोमवार ते शुक्रवार अशा अप आणि डाऊनला एकूण १६ शटल फेऱ्या, तर शनिवार आणि रविवारी अप व डाऊनला मिळून २० शटल फेऱ्या होतात. सोमवार ते शुक्रवारीही गर्दी होत असल्याने या दिवसांत चार फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. माथेरानच्या दिशेने दोन, तर अमन लॉजच्या दिशेने जाण्यासाठी दोन फेऱ्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवारी दररोज एकूण १६ ऐवजी २० फेऱ्या होतील.  २०२१-२०२२ मध्ये तीन लाख सहा हजार पर्यटक आणि स्थानिकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे.

नेरळ – माथेरान मिनी ट्रेनसाठी प्रतीक्षा

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रिबदू ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन सध्या अमन लॉज ते माथेरानपर्यंत धावत आहे. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनसाठी पर्यटकांना आणखी सात ते आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेरळपासून रुळ बदलण्यासह अन्य कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आली असून डिसेंबर २०२२ नंतरच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन धावणार आहे.

बदल काय?

सोमवार ते शुक्रवार अमन लॉज ते माथेरान ते अमन लॉज अशा शटल सेवेच्या १६ फेऱ्या होत असून त्यात आणखी चार फेऱ्यांचा समावेश केला आहे. नव्या फेऱ्यांची अंमलबजावणी शुक्रवारपासून झाली असून येत्या ३१ मेपर्यंत ती असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांचा प्रतिसाद.. 

मिनी ट्रेनला एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तीन लाख सहा हजार ७६३ पर्यटकांनी मिनी ट्रेनमधून प्रवास केला असून ४२ हजाराहून अधिक मालवाहतूकही करण्यात आली आहे. यामुळे एक कोटी ७८ लाख प्रवासी उत्पन्न मिळाले आहे.

अमन लॉज ते माथेरान- स. ८.४० वा

अमन लॉज ते माथेरान- सायं.५.३५ वा

माथेरान ते अमन लॉज-स.८.१५ वा

माथेरान ते अमन लॉज-सायं.५.२८ वा