मुंबई : माथेरानच्या मिनी ट्रेनचे पर्यटकांना कायमच आकर्षण असून या ‘राणी’ला गेल्या वर्षभरात पर्यटक आणि स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये सोमवार ते शुक्रवारी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये देशभराच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर विदेशातील पर्यटकही येत असतात. या पर्यटकांना माथेरान मिनी ट्रेन कायमच आकर्षित करीत असते. या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोम डबाही (काचेचा पारदर्शक डबा) जोडण्यात आला आहे. स्थानिकांनाही या ट्रेनची खूप मदत होते. टाळेबंदीच्या काळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच काहींनी पर्यटनासाठी माथेरानमध्ये जाणे पसंत केले. परंतु बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे र्पयटकांचा हिरमोड होत होता. तसेच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिकांनाही नेरळ – माथेरान प्रवासासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू करण्यात आली.  वाढत्या प्रतिसादामुळे मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now extended service queen of matheran holiday rush train journeys tourists ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST