फोन लागत नाही, इंटरनेट सुविधा मिळत नाही म्हणून वापरकर्ते अनेकदा मोबाइल नेटवर्क कंपन्यांच्या नावाने ओरडत असतो. पण त्याची रितसर तक्रार करावयाची म्हटले तरी ती प्रक्रिया सोपी नसल्याने अनेकदा ग्राहक या भानगडीत पडत नाहीत. पण आता ग्राहक या संदर्भातील तक्रार आपण थेट ‘टेलिकॉम नियामक प्राधिकार’ (ट्राय)कडे करता येणार आहे.
ग्राहकांना तक्रारींसाठी सोपे माध्यम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रायने http://www.tccms.gov.in/  हे संकेतस्थळ सुरू केले असून त्याचे अ‍ॅपही बाजारात आणले आहेत. यामुळे मोबाइल ग्राहक तातडीने तेथे दिलेल्या पर्यायाच्या मदतीने तक्रार नोंदवू शकतो. इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेता ट्रायने हे पाऊल उचलले असल्याचे ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले. सध्याच्या नियमांनुसार ट्राय टेलिकॉम कंपनीला ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करू शकते. जर मोबाइल कंपनीने तीच चूक पुन्हा केली तर हा दंड एक लाख रुपयांपर्यत वाढू शकतो.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल